• Download App
    Injuries | The Focus India

    Injuries

    Bangladesh : बांगलादेशात 5.7 तीव्रतेचा भूकंप, 3 जणांचा मृत्यू, 200 जण जखमी; आयर्लंड-बांगलादेश क्रिकेट सामना थांबवला

    शुक्रवारी सकाळी १०:०८ वाजता (भारतीय वेळेनुसार) बांगलादेशला ५.७ तीव्रतेचा भूकंप झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला आणि २०० हून अधिक जण जखमी झाले. भूकंपाचे केंद्रबिंदू ढाक्यापासून फक्त २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसिंगडी येथील माधाबादी येथे होते. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की दहा मजली इमारत बाजूला झुकली. बांगलादेशमध्ये सुरू असलेला बांगलादेश-आयर्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनाही थांबवण्यात आला.

    Read more

    Vashi Raheja : वाशीतील रहेजा रेसिडन्सीमध्ये भीषण आगीत 4 जणांचा मृत्यू, 10 जखमी

    नवी मुंबईच्या वाशी परिसरातील सेक्टर 14 मधील एम. जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीत मध्यरात्री भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा वर्षांची चिमुरडी आणि एका 84 वर्षीय आजीचा समावेश आहे.

    Read more

    Afghanistan : अफगाणिस्तान भूकंपात 800 ठार, 2500 जखमी; मध्यरात्री 6 रिश्टर स्केलचा भूकंप

    रविवारी मध्यरात्री ११:४७ वाजता (स्थानिक वेळेनुसार) अफगाणिस्तानमध्ये ६ तीव्रतेचा भूकंप झाला. आतापर्यंत ८०० लोकांचा यात मृत्यू झाला आहे, तर २५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

    Read more

    Los Angeles : लॉस एंजेलिसमध्ये ड्रायव्हरने गर्दीत कार घुसवली; 20 जखमी, 10 गंभीर; अपघाताचे कारण अस्पष्ट

    शनिवारी अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये एका कारने गर्दीला चिरडले. या अपघातात २० जण जखमी झाले आहेत, त्यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात स्थानिक वेळेनुसार पहाटे २ वाजता वेस्ट सांता मोनिका बुलेव्हार्ड येथे घडला, जो एका संगीत स्थळाजवळ आहे.

    Read more

    Telangana : तेलंगणात केमिकल फॅक्टरी स्फोटात मृतांचा आकडा 34 वर; ढिगाऱ्यातून 31 मृतदेह काढले, रुग्णालयात 3 मृत्यू

    तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील औषध कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या ३४ वर पोहोचली आहे. कारखान्यातून ३१ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याच वेळी, रुग्णालयात ३ जणांचा मृत्यू झाला. ३० हून अधिक जण जखमी आहेत.

    Read more

    Jejuri Accident : पुण्यातील जेजुरीजवळ भीषण अपघात; भरधाव कारची उभ्या टेम्पोला धडक, 8 जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी

    पुणे जिल्ह्यातील जेजुरी -जेजुरी मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघात आठ जण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री सव्वा 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

    Read more