US Tariffs : अमेरिकेच्या आयात शुल्कांमुळे पंजाबला 30,000 कोटी रुपयांचे नुकसान; कापड निर्यातीत 8,000 कोटींचा फटका
अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफ वॉरमुळे पंजाबच्या उद्योगाला ३०,००० कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्याचा परिणामही दिसू लागला आहे. अनेक उद्योगपतींचे ऑर्डर थांबले आहेत. टॅरिफमुळे एकट्या पंजाबच्या ७ औद्योगिक क्षेत्रांना २०,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.