Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता हॉटेल्स, दुकाने आणि आस्थापना 24 तास सुरू ठेवता येणार
राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना आता 24 तास उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाने यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील व्यापारी व्यवहारांना नवे बळ मिळण्याची आणि ग्राहकांना दिवस-रात्र सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.