Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण निर्णय; महाराष्ट्र बनणार ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर’चे हब, उद्योग विभागाचे GCC धोरण 2025 मंजूर
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. नागरिकांच्या आरोग्य सेवेपासून ते औद्योगिक विकास, ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा, नियोजनातील तांत्रिक प्रगती आणि न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणापर्यंत विविध स्तरांवर परिणाम करणारे हे निर्णय आहेत. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे राज्यातील जनजीवन अधिक सक्षम होईल, तसेच प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.