इंदू मिलच्या परिसरात बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर; एकनाथ शिंदेंकडून कामाची पाहणी
दादरच्या इंदू मिलच्या परिसरात राज्यघटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दादरच्या चैत्यभूमी परिसरात तयार होत असलेल्या इंदू मिल स्मारकाची पाहणी करून कामाची प्रगती जाणून घेतली. यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हेदेखील सोबत होते.