Indrajit Sawant : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरण; प्रशांत कोरटकरला कोर्टाचा 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी दिल्याप्रकरणी फरार असलेल्या प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनावर मंगळवारी कोल्हापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. कोरटकरला प्रत्यक्ष हजर ठेवावे की नाही यावर आज न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यानुसार आता प्रशांत कोरटकरला 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यात आला आहे