मुख्यमंत्री निवडीच्या स्पर्धेत मोदी इंदिरांवर भारी; सोशल इंजीनियरिंगचे सगळेच प्रयोग यशस्वी!!
दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी रेखा गुप्ता यांची निवड करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा मीडियाला “सरप्राईज” दिले तर भाजप मधल्या अनेकांना ते “धक्कातंत्र” वाटले. मीडियाने रेसमध्ये ठेवलेल्या नावांपैकी मोदींनी सगळ्यात वरचा नव्हे, तर खालचा चॉईस निवडला.