मोदींचा काँग्रेसवर “इंदिरा पाचर” प्रयोग!!
बिहार विधानसभा निवडणूक यांचा निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणातून जे मोठे राजकीय भाकीत वर्तविले, ते काँग्रेस फुटीचे आहे. बिहारच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून काँग्रेसच्या सध्याच्या आमदारांच्या विरोधात काँग्रेस मधले नेते आणि कार्यकर्ते बंडखोरी करायच्या तयारीत आहेत. इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काम केलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सध्याच्या नामदारांचे नेतृत्व मान्य नाही कारण सध्याच्या नामदारांनी मूळ काँग्रेसची “मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस” करून टाकली आहे, अशी खिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उडवली. त्यापुढे जाऊन त्यांनी काँग्रेसमध्ये लवकरच मोठी फूट पडेल, असे भाकीत केले.