India’s Got : इंडियाज गॉट लेटेंटचा मुद्दा IT मंत्रालयाकडे जाण्याची शक्यता; स्थायी समितीत मागणी
स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोचा वाद वाढत चालला आहे. दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या बैठकीत इंडियाज गॉट लेटेंटचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अशा कार्यक्रमांमधून दाखवल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह आणि अश्लील मजकुरावर चर्चा झाली.