Indians : अमेरिकेतून हद्दपार झालेल्या भारतीयांची तिसरी तुकडी भारतात पोहोचली; अमृतसर विमानतळावर 112 जण उतरले
अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांची तिसरी तुकडी आज (16 फेब्रुवारी) रात्री 10 वाजता अमृतसर विमानतळावर उतरली. अमेरिकन हवाई दलाच्या C-17A ग्लोबमास्टर विमानात 112 लोक असल्याची माहिती आहे. विमानतळावरील इमिग्रेशन अधिकारी निर्वासितांची चौकशी करतील. त्यांना बाहेर येण्यासाठी 3 ते 4 तास लागू शकतात.