Shrikant Shinde : विरोधकांच्या ‘50 खोके’ घोषणांवर श्रीकांत शिंदेंचा पलटवार- मॅच्युअर व्हा, तुम्ही आता महापालिकेत नाहीत, त्यातून बाहेर या!
सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, सभागृहात ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावर तीव्र चर्चा रंगली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेवेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार चकमक होत आहे. आज लोकसभेत शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जोरदार भाषण करत काँग्रेसवर आणि विरोधकांवर तीव्र शब्दांत टीका केली. श्रीकांत शिंदेंचे भाषण सुरू असताना विरोधकांनी ‘50 खोके एकदम ओके’ अशी घोषणाबाजी केली. यामुळे श्रीकांत शिंदे संतापल्याचे पाहायला मिळाले.