Mega Defence Boost : सैन्याला आत्मघाती ड्रोन, नवीन पिनाका रॉकेट, ड्रोन रडार मिळतील; ₹79 हजार कोटींच्या संरक्षण कराराला मंजुरी
संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सुमारे 79,000 कोटी रुपयांच्या प्रगत शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषद (DAC) च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.