Ukraine : युक्रेनचा रशियावर 1000 ड्रोनने हल्ला; सेमीकंडक्टर प्लांट, तेल शुद्धीकरण कारखान्याला लक्ष्य केले; एका भारतीयासह 4 जणांचा मृत्यू
युक्रेनने शनिवारी रात्री रशियाच्या अनेक भागांवर 1000 हून अधिक ड्रोनने हल्ला केला. अहवालानुसार, यात किमान 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 1 भारतीय मजुराचाही समावेश आहे. रशियातील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली.