Indian Army : भारतीय लष्कराला १५६ लढाऊ हेलिकॉप्टर मिळणार, ४५ हजार कोटींचा करार!
भारत आपली लष्करी शक्ती आणखी मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलणार आहे. २०२५-२६ पर्यंत १५६ स्वदेशी ‘प्रचंड’ लढाऊ हेलिकॉप्टर (LCH) खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा करार स्वावलंबी भारताला चालना देण्यासाठी आणि भारतीय हवाई दल आणि लष्कराची ताकद वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. याशिवाय, भारताचे स्वावलंबन वाढवण्याच्या दिशेने हे एक पाऊल देखील म्हणता येईल.