LoC Firing in Keran : जम्मू-काश्मीरच्या केरनमध्ये निगराणी कॅमेरे बसवताना पाककडून फायरिंग; भारतीय सैन्याकडून प्रत्युत्तरात अचूक-नियंत्रित गोळीबार
उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये २० आणि २१ जानेवारीच्या रात्री प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात गोळीबार झाला. सूत्रांनुसार दोन्ही बाजूंनी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. लष्कराने अद्याप या घटनेची अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.