पुतिन यांच्या बहुचर्चित दौऱ्यातून भारताची अपेक्षा काय??, मिळणार काय??
रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर लादिमीर पुतीन यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातले राजनैतिक, लष्करी आणि सामरिक संबंध मोठ्या उंचीवर जाण्याची अपेक्षा असताना केवळ राजनैतिक आणि लष्करी संबंधांवर भर न देता ते अन्य क्षेत्रांमध्ये विस्तारित व्हावेत याकडेही पुतिन यांच्या दौऱ्यातून भर देण्यात येणार आहे. भारत आणि रशिया या दोन्ही देशांची सरकारी आणि प्रशासने त्या दृष्टीने तयारी केली आहे.