India Wins Asia Cup : भारताने नवव्यांदा आशिया कप जिंकला; पाकिस्तानला 5 विकेट्सने हरवले, तिलक वर्माच्या नाबाद 69 धावा; कुलदीपच्या 4 विकेट
भारताने आशिया कप जिंकला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने या स्पर्धेचे ९ व्यांदा विजेतेपद पटकावले आहे.रविवारी, भारतीय संघाने २० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर १४७ धावांचे लक्ष्य गाठले. रिंकू सिंगने चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. तिलक वर्मा ६९ धावा करून नाबाद राहिला.