G20 Summit : गोऱ्या लोकांवरील अत्याचाराचे कारण देत ट्रम्प G20 मध्ये गैरहजर, पुतिन यांना अटक होण्याची भीती, शी जिनपिंग आजारी
दक्षिण आफ्रिकेतील श्वेतवर्णीय शेतकऱ्यांवरील अत्याचारांचा उल्लेख करून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यावर्षीच्या G20 शिखर परिषदेतून गैरहजर राहिले आहेत. दरम्यान, युक्रेन संघर्षासंदर्भात आयसीसीकडून अटक वॉरंट जारी होण्याची भीती असल्याने पुतिन यांनी उपस्थित राहण्याचे टाळले आहे.