Bawankule : राहुल गांधींची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचे जिवंत उदाहरण; चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
राहुल गांधी यांची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचे, नैराश्याचे आणि त्यांच्या अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याचे भाजपचे नेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे मोदी, ‘शो’ नाहीतर ‘विकासाचा रोड शो’ असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करत त्यांच्यासाठी ‘गुब्बारा’ शब्द वापरला होता. यावरुन बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.