Parliament : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून; ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरून गदारोळाची शक्यता
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान युद्धबंदी, डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्धबंदीवरील दावे आणि बिहार मतदार यादी यासारख्या मुद्द्यांवर गोंधळ होण्याची शक्यता आहे. या सर्व मुद्द्यांवर विरोधकांना पंतप्रधानांकडून उत्तरे हवी आहेत.