India-Pak : भारत-पाक तणावादरम्यान परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी; मे महिन्यात आतापर्यंत ₹14,167 कोटींची गुंतवणूक
मे महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) १४,१६७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. भारत-पाकिस्तान तणाव असूनही, एफआयआय भारतीय बाजारात सतत खरेदी करत आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला, २०२५ मध्ये परदेशी गुंतवणूकदार पहिल्यांदाच ४,२२३ कोटी रुपयांच्या खरेदीसह निव्वळ खरेदीदार बनले.