India Gate Protest : दिल्लीत प्रदूषणाविरुद्ध आंदोलन: इंडिया गेटवर नक्षली हिडमाचे पोस्टर झळकले, लाल सलाम व अमर रहेच्या घोषणा
रविवारी संध्याकाळी उशिरा दिल्लीतील इंडिया गेटवर वायू प्रदूषणाविरुद्ध निदर्शने करणाऱ्या लोकांनी देशातील मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी कमांडर माडवी हिडमाचे (४४) पोस्टर झळकावले. पोस्टरमध्ये हिडमाची तुलना आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्याशी करण्यात आली होती. त्याचे जल, जंगल आणि जमिनीचे रक्षक म्हणून वर्णन करण्यात आले होते.