India-France : भारत-फ्रान्स संयुक्त लष्करी सराव ‘शक्ती-२०२५’ मुळे भारतीय सैन्याची क्षमता वाढणार
भारत-फ्रान्स संयुक्त लष्करी सराव शक्ती-२०२५ हा ला कॅव्हलरी येथे सुरू आहे. हा सराव १८ जूनपासून सुरू आहे आणि १ जुलैपर्यंत सुरू राहील. दक्षिण फ्रान्समधील ला कॅव्हलरी येथील कॅम्प लार्झाक येथे आयोजित या सरावात भारतीय लष्कराच्या जम्मू आणि काश्मीर रायफल्स बटालियनचे ९० जवान तसेच फ्रेंच लष्कराच्या डेमी-ब्रिगेड डी लीजन एट्रांगेरेचे सैनिक सहभागी होत आहेत.