India Cooperative Bank : मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत १२२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार
मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी बँकेचे महाव्यवस्थापक आणि लेखा प्रमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध १२२ कोटी रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. या अपहार प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून (EOW) केली जाईल.