India-Bhutan railway : भारत-भूतान रेल्वेचा पहिला दुवा! 4,033 कोटींचा प्रकल्प, वंदे भारत ट्रेनही सुरू होणार
शतकानुशतकांची शेजारधर्माची नाती आता लोहमार्गातून आणखी घट्ट होणार आहेत. भारत आणि भूतान यांच्यात पहिल्यांदाच रेल्वे दुव्याची घोषणा झाली असून, केंद्र सरकारने तब्बल 4,033 कोटींचा खर्च मंजूर केला आहे. हा प्रकल्प “मेक इन इंडिया”चा एक मोठा टप्पा मानला जात आहे.