• Download App
    India beat England | The Focus India

    India beat England

    India beat England : वानखेडेवर भारताने इंग्लंडला १५० धावांनी हरवले, मालिका ४-१ ने जिंकली

    भारताने पाचव्या आणि शेवटच्या T20 सामन्यात इंग्लंडचा पराभव केला आहे. वानखेडे येथे खेळला गेलेला ५वा टी-२० सामना टीम इंडियाने १५० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. यासह भारताने मालिका ४-१ अशी जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ९ विकेटच्या मोबदल्यात २४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १०.३ षटकांत ९७ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडकडून फिल सॉल्टने सर्वाधिक ५५ धावांची खेळी खेळली. तर भारताकडून मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतल्या. तर अभिषेक शर्मा, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर रवी बिश्नोईला एक विकेट मिळाली

    Read more