• Download App
    India Bangladesh Friendship Pipeline restart 2026 | The Focus India

    India Bangladesh Friendship Pipeline restart 2026

    India-Bangladesh : बीएनपी सरकारमुळे भारत-बांग्लादेश संबंधांत सुधारणा:8 प्रकल्पांना पुन्हा गती, उभय देशांतील संबंध पूर्ववत करण्यास वेग; व्हिसा सेवाही उपलब्ध

    बांग्लादेशात ५ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या राजकीय बदलानंतर सत्तेवर आलेल्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) सरकारमुळे भारत-बांग्लादेश संबंधांत सुधारणा होण्याचे संकेत दिसू लागले आहेत. दीड वर्षांच्या तणावानंतर उभय देशांनी रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना वेग आणला आहे. नवीन सरकारने सत्तेवर येताच मंआधीचे सामंजस्य करार (एमओयू) आणि प्रकल्प पुन्हा मार्गावर आणण्याचा प्रयत्न सुरू केला. शपथविधीनंतरच्या पहिल्याच आठवड्यात भारतीयांसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू केले.

    Read more