Ajit Pawar : पुरुष असूनही काहींनी लाडक्या बहिणींचा लाभ घेतला; अजित पवार म्हणाले- जूनमध्ये कर्जमाफीचा निर्णय, पण एकदाच
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते झाला. शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीपूजन आणि मोळी टाकून गळीत हंगामाचे उद्घाटन करण्यात आले. पारंपरिक संगीत, शेतकऱ्यांचा उत्साह आणि कारखान्याच्या परिसरात उभा असलेला गजबजलेला माहोल यामुळे संपूर्ण परिसरात सणासारखे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी आणि कारखान्याच्या प्रगतीबाबत महत्त्वपूर्ण भाष्य करत राज्याच्या आर्थिक आणि कृषी धोरणांबाबत अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला.