Income Tax : नवीन आयकर विधेयकातील कलमांची संख्या कमी करा; ICAI ने दिला सल्ला!
चार्टर्ड अकाउंटंट्सची सर्वोच्च संस्था असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने नवीन आयकर विधेयकात काही महत्त्वाचे बदल करण्याची मागणी केली आहे. गुरुवारी, आयसीएआयने नवीन आयकर विधेयकाची तपासणी करणाऱ्या लोकसभेच्या निवड समितीला त्यांच्या सूचना सादर केल्या.