Chairman CJ Roy : आयकरच्या छाप्यावेळी उद्योजकाची आत्महत्या; कॉन्फिडेंट ग्रुपच्या चेअरमनची 9000 कोटींची मालमत्ता
कॉन्फिडेंट ग्रुपचे अध्यक्ष सीजे रॉय यांनी शुक्रवारी सेंट्रल बेंगळुरूमध्ये रिचमंड सर्कलजवळ असलेल्या कंपनीच्या कार्यालयात स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना दुपारी सुमारे 3.15 वाजता घडली. त्यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून आयकर (IT) विभागाची तपासणी सुरू होती. आत्महत्येनंतर आयकर अधिकारी घटनास्थळावरून निघून गेले.