Income Tax Bill नवीन आयकर विधेयक- 31 सदस्यीय समिती स्थापन; भाजप खासदार बैजयंत पांडा अध्यक्ष
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी नवीन आयकर विधेयकासाठी ३१ सदस्यांची निवड समिती स्थापन केली. भाजप खासदार आणि ओडिशातील केंद्रपाडा येथील खासदार बैजयंत पांडा यांना अध्यक्ष बनवण्यात आले आहे. समितीला पुढील सत्राच्या पहिल्या दिवशी अहवाल सादर करावा लागेल.