PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- मी शिवभक्त, विष पितो; जनता माझा देव, आत्म्याचा आवाज इथे नाही तर कुठे निघणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. मोदींनी दरंग मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, जीएनएम स्कूल आणि बीएससी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्याची किंमत ६३०० कोटी आहे. मोदी दरंग जिल्ह्यातील मंगलदोई आणि गोलाघाटमधील नुमालीगड रिफायनरीलाही भेट देतील.