Imtiaz Jaleel : MIM चे इम्तियाज जलील ‘मातोश्री’वर; उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
एमआयएमचे नेते तथा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज अचानक मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समजला नाही. पण यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत.