Manipur Violence : मणिपूरमध्ये हिंसाचाराचा नवा उद्रेक; कुकी समाजातील 2 जणांची हत्या, 30 घरे जाळली; एक दिवसापूर्वी 6 नागा नागरिकांचे मृतदेह सापडले
मणिपूरमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या जातीय संघर्षाला पुन्हा एकदा हिंसक वळण मिळाले आहे. गुरुवारी पहाटे कामजोंग जिल्ह्यातील कुलतूह कुकी गावावर संशयित सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला चढवत कुकी समाजातील दोन जणांची गोळ्या झाडून हत्या केली. हल्लेखोरांनी गावातील सुमारे 30 घरांनाही आग लावल्याने मोठे नुकसान झाले आहे.