IMF : IMF ने भारताच्या GDP वाढीचा अंदाज 0.30% ने घटवला; आर्थिक वर्ष 2025-26साठी 6.2%
२०२५-२६ या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ६.२% दराने वाढेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) वाढीचा अंदाज कमी केला आहे. यापूर्वी, आयएमएफने आर्थिक वर्ष २६ मध्ये विकास दर ६.५% राहण्याचा अंदाज वर्तवला होता.