Iltija Kathua : मेहबूबा यांच्या कन्येचे 2 खासगी सुरक्षा अधिकारी निलंबित; नजरकैदेत असूनही इल्तिजा कठुआला पोहोचल्या
जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा हिच्या दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांना (PSO) निलंबित करण्यात आले आहे. श्रीनगरमध्ये नजरकैदेत असूनही इल्तिजा कठुआला पोहोचल्यानंतर ओमर सरकारने ही कारवाई केली आहे.