Bihar Voter List : बिहारच्या व्होटर लिस्टमध्ये नेपाळ-बांगलादेशचे लोक; 1 ऑगस्टपासून चौकशी
बिहारमध्ये मतदार यादी पडताळणीचे काम सुरू आहे. यादरम्यान, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे की बिहारमध्ये मोठ्या संख्येने परदेशी नागरिक आहेत.निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, “मतदार यादी सुधारणेसाठी आम्ही घरोघरी भेटी दिल्या. या दरम्यान आम्हाला नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमारमधील मोठ्या संख्येने लोक आढळले.”