Bangladesh : बांगलादेशात हिल्सा माशांच्या बचावासाठी वॉरशिप तैनात; हेलिकॉप्टरद्वारे देखरेख सुरू
हिल्सा माशांची बेकायदेशीर पकड रोखण्यासाठी बांगलादेशने सैन्य तैनात केले आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, १७ युद्धनौका आणि गस्त घालणारे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत.देशी आणि परदेशी मच्छिमारांना खोल समुद्रात घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी ही जहाजे आणि गस्त घालणारी विमाने २४ तास देखरेख करत आहेत. बांगलादेशी अधिकाऱ्यांनी ४ ते २५ ऑक्टोबर दरम्यान हिल्सा प्रजनन क्षेत्रात मासेमारीवर बंदी घालण्यात आल्याचे सांगितले आहे.