Azerbaijan : अझरबैजानने म्हटले- भारताने SCO मध्ये एंट्री रोखली; पाकिस्तानशी संबंधांचा बदला घेतोय भारत, राष्ट्रपती अलियेव यांचा आरोप
अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलीयेव यांनी भारतावर पाकिस्तानशी असलेल्या अझरबैजानच्या जवळीकतेचा जागतिक व्यासपीठांवर बदला घेतल्याचा आरोप केला आहे. सोमवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेच्या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांनी हे विधान केले.