Nepal : नेपाळमध्ये भूस्खलनामुळे दोन दिवसांत 51 जणांचा मृत्यू; 9 जण बेपत्ता; लष्कराच्या हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू
शुक्रवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या भूस्खलन आणि पुरामुळे नेपाळमध्ये ५१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन दिवसांत नऊ जण बेपत्ता आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूर्व नेपाळमधील इलाम जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झाले आहे, जिथे भूस्खलनात ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.