Igla S missile : भारतीय लष्कराला रशियन बनावटीचे इग्ला-एस क्षेपणास्त्र मिळाले
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावादरम्यान भारतीय सैन्याची क्षमता वाढली आहे. लष्कराला रशियन बनावटीचे इग्ला एस क्षेपणास्त्र मिळाले आहेत. हे खांद्यावरून मारा करणारे क्षेपणास्त्र शत्रूचा नाश करेल. याशिवाय आणखी ९० क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची तयारी भारताने सुरू केली आहे.