ICSSR : महाराष्ट्रातील मतदारांच्या खोट्या दाव्याने CSDS अडचणीत, आयसीएसएसआर कारणे दाखवा नोटीस बजावणार
महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारांच्या संख्येतील तफावतीचा चुकीचा दावा करणे सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ला (सीएसडीएस) अंगलट आले आहे. याप्रकरणी माफी मागितल्यानंतरही सीएसडीएसला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा विचार भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएसएसआर) केला आहे. डेटातील फेरफारीने सीएसडीएसकडून अनुदान-सहाय्य नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका आयसीएसएसआरने ठेवला आहे.