Hasan Mushrif : सतेज पाटील आणि आमच्यातील दोरी तुटली; कॉंग्रेसवर त्यांच्याच लोकांचा विश्वास नाही, हसन मुश्रीफ यांचा खोचक टोला
सतेज पाटील आणि आमच्यातील दोरी तुटली असल्याचे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. तसेच पाच वर्षे आमदारकी शिल्लक असताना प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिला यावरूनच कळते कॉंग्रेसवर त्यांच्याच लोकांचा विश्वास राहिलेला नाही. माझे मित्र विरोधी पक्षनेता होणार म्हणून बसले होते. मात्र, बिचाऱ्यांचे दुर्दैव असल्याचा खोचक टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे.