IAEA : पाकिस्तान बदमाश देश, त्याची अण्वस्त्रे इंटरनॅशनल ऍटोमिक एनर्जी एजन्सीच्या निगराणी खाली आणा!!
पाकिस्तान हा एक बदमाश देश आहे. त्याने निर्माण केलेली अण्वस्त्रे त्याच्याच हातात “सुरक्षित” नाहीत. त्यामुळे पाकिस्तानची अण्वस्त्रे इंटरनॅशनल ऍटोमिक एनर्जी एजन्सीच्या (IAEA) निगराणी खाली आणा, अशी महत्त्वपूर्ण मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरच्या धरतीवरून केली.