Nitesh Rane : नितेश राणे म्हणाले- आमच्या हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेवच चालणार; मी काही पाकिस्तानमध्ये बसून नाही लिहिले
भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी ‘आय लव्ह महादेव’ अशी पोस्ट केली होती. त्यावर बोलताना राणे म्हणाले, एम फॉर महाराष्ट्र, एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव. हे सरळ स्पष्ट आहे. आमच्या हिंदू राष्ट्रांत आय लव्ह महादेवच चालणार. मी काही पाकिस्तान, कराची इस्लामाबादमध्ये बसून आय लव्ह महादेव लिहिलेले नाही, असे राणेंनी म्हटले आहे.