Hyderabad : हैदराबाद गॅझेटियरला आव्हान देणारी याचिका फेटाळली; कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार
मुंबई उच्च न्यायालयाने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा आणि मराठा आरक्षणाची प्रक्रिया गतिमान करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी होणार होती, परंतु तांत्रिक कारणांमुळे न्यायालयाने या याचिका ऐकण्यास नकार दिला.