Madat Mash Land : हिवाळी अधिवेशन: ‘मदत माश’ जमिनी होणार मोफत नियमित; हैदराबाद इनामे व रोखे अनुदाने रद्द सुधारणा विधेयक मंजूर
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील आणि चंद्रपूरच्या राजुरा भागातील सुमारे 70 हजार कुटुंबांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यातील हजारो कुटुंबांच्या डोक्यावर टांगती तलवार असलेल्या ‘मदत माश’ इनामी जमिनींचा प्रश्न अखेर निकाली निघाला. या जमिनींवरील निवासी घरे नियमित करण्यासाठी आता कोणताही नजराणा भरावा लागणार नाही. ती घरे मोफत नियमित करून रहिवाशांना जमिनीचे ‘वर्ग-1’ मालकी हक्क देणारे ‘हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबा