• Download App
    Hyderabad Gazetteer | The Focus India

    Hyderabad Gazetteer

    Vijay Wadettiwar : स्थानिकच्या निवडणुकीत मूळ OBC ला फटका बसणार- वडेट्टीवारांचा दावा; मराठा समाज सर्व जागा घेऊन जाण्याची व्यक्त केली भीती

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूक मूळ ओबीसींना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ओबीसींच्या सर्व जागा कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आलेले मराठा समाजाचे उमेदवार घेऊन जातील. त्यामुळे त्यांच्या हाती काहीच उरणार नाही, अशी भीती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी व्यक्त केली. वडेट्टीवार यांच्या या दाव्याने ओबीसी समुदायात एकच खळबळ माजली आहे.

    Read more

    Laxman Hake : लक्ष्मण हाकेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना भावनिक पत्र- जरांगे मुखवटा, क्रूर मराठा राजकीय नेत्यांचा हेतू साध्य, स्पर्धेत मूळ ओबीसी कसा टिकेल?

    राज्यात मराठा आरक्षणावरून ओबीसी समाज आक्रमक झाला असून, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन आदेशामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आले असून, ओबीसी समाजाची मसलत संपल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

    Read more

    Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचा मनोज जरांगे यांना इशारा- आमचे 2% काढणाऱ्यांना टक्क्यातही ठेवणार नाही; वंजारी समाज ST मध्ये असल्याचा पुनरुच्चार

    वंजारी समाजाचे 2 टक्के आरक्षण काढून घेण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही टक्क्यातही ठेवणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या या इशाऱ्यामुळे मराठा आरक्षणामुळे निर्माण झालेला वाद अधिकच चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे.

    Read more

    Radhakrishna Vikhe Patil, : विखे पाटलांची घणाघाती टीका- आज समाजात दुही, विसंवाद व संघर्ष; या पापाचे धनी शरद पवार

    भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांवर प्रखर टीका केली आहे. समाजा-समाजात आज दुही, विसंवाद आणि संघर्ष निर्माण झाला आहे. त्या पापाचे धनी शरद पवारच आहेत, अशी टीका विखे पाटलांनी केली आहे. तसेच 1994 साली जर शरद पवारांनी मराठा समाजाचा समावेश केला असता, तर आजची परिस्थिती नसती, असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.

    Read more

    Maratha reservation : मोठी बातमी : 2 सप्टेंबरच्या मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार

    राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजासाठी आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला होता. या निर्णयाविरुद्ध काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात बऱ्याच याचिका दाखल केल्या होत्या. याचिकांकर्त्यांनी अध्यादेशावर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली असली तरी न्यायालयाने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे राज्य सरकार आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

    Read more

    Banjara Community : बंजारा समाजालाही आरक्षण द्यावे:अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, धर्मगुरू जितेंद्र महाराज यांचा इशारा

    शासनाने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटीयर लागू केले त्यानुसारच बंजारा समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण द्यावे अन्यथा रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा बंजारा समाजाचे धर्मगुरु जितेंद्र महाराज (पोहरादेवी) यांनी रविवारी ता. ७ हिंगोली ेयेथे दिला आहे.

    Read more