Afghanistan : अफगाणिस्तान भूकंपातील मृतांची संख्या 1400 पार; भारताने पाठवले 15 टन अन्न आणि 1000 तंबू
अफगाणिस्तानातील भूकंपात मृतांचा आकडा १४११ वर पोहोचला आहे, तर जखमींची संख्या ३२५० पेक्षा जास्त झाली आहे. वृत्तसंस्था एपीनुसार, तालिबानने ही माहिती दिली आहे.रविवारी रात्री अफगाणिस्तानातील जलालाबादजवळ ६.० तीव्रतेचा भूकंप झाला. त्यावेळी बहुतेक लोक झोपले होते, त्यामुळे ते इमारतींच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.