Ravi Rana, : बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या, आमदार रवी राणांची मागणी, परवानगी दिल्यास दोन बिबटे पाळणार!
राज्यात सध्या बिबट्यांचा मानवी वस्तीत वाढलेला वावर आणि त्यामुळे निर्माण झालेली दहशत हा चिंतेचा विषय ठरला आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही या मुद्द्यावर गंभीर चर्चा सुरू असतानाच, सत्ताधारी पक्षाचे समर्थक आमदार रवी राणा यांनी या समस्येवर एक अजब तोडगा सुचवला आहे. “बिबट्यांना थेट ‘पाळीव प्राण्या’चा दर्जा द्यावा,” अशी मागणी रवी राणा यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. एवढेच नव्हे तर, परवानगी मिळाल्यास आपण स्वतः दोन बिबटे पाळायला तयार असल्याचेही राणा यांनी जाहीर केले आहे.